पुणे : पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमी म्हणतो. पण दिवसेंदिवस पुणे आता वेगवेगळ्या घटनानांनी चर्चेत येत आहे. पुण्यात गुन्हेगारीचा आलेख देखील वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे.
एका इमारतीच्या पहिल्या मजल्यानवरून गाडी मागे घेताना वाहन चालकाच्या एका चुकीमुळे गाडी मागे घेताना थेट पहिल्या मजल्यावरून भिंत तोडून खाली कोसळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायराल झाला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास विमाननगर भागात ही घटना घडली आहे.
विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार खाली पडताना दिसत आहे. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे घडल्याची माहिती समोर येत असून पार्किंगमध्ये चालकाने कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली. इमारतीच्या पार्किंगची भिंत तकलादू असल्यामुळे कारची धडक बसल्यामुळे भिंत लगेच तुटली आणि कार खाली कोसळली.
पहिल्या मजल्यावरुन कोसळल्यानंतर कार भिंतीला टेकू देऊन उभी राहिली. कारचा वेगळा अधिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. कार उभी राहिल्यानंतर गाडीत बसलेला नागरिक खाली उतरले. यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेचा सिसिटीव्ही समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.