प्रियकराचा मानसिक त्रास, प्रियेसीने मित्रांच्या मदतीने काढला काटा

पुणे : प्रियकर सतत मानसिक त्रास देत असल्याने प्रेयसीने मित्रांच्या मदतीने त्याची हत्या केल्याची घटना समोर अली आहे एवढेच नाही तर हत्या केल्यावर त्याच्या मृत्यू अपघातनेझाल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तिघांसह महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तसेच रेखा विश्वंभर भातनासे असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. तिच्या अल्पवयीन मुलीला देखील हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने हा पर्दाफाश केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर सारखा त्रास देत असल्याने प्रियेसीने दि. 17 रोजी रात्री प्रियसीने प्रियकर बालाजी याला संपवण्याचा कट रचला. बालाजीला भेटायला बोलावले. त्या अगोदर तीने रुममध्ये काही मित्रांना बोलावले होते. बालाजी तिथे येताच त्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली त्यात त्याला अतिशय जखमी अवस्थेत अपघात झाल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी सर्व घटनेचा बारीक तपास करत मुख्य सूत्रधार असलेल्या प्रियेशीपर्यंत पोलीस पोहचले. मानसिक त्रास देत असल्याने तीने प्रियकराचा खून केल्याचे समोर आले.

आरोपी रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नावे सांगितली असल्याचे पोलीस तापसात उघड झाले आहे.