Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

Breking…!शरद पवारांची तब्येत खालावली, पुढीच चार दिवसांचे कार्यक्रम रद्द

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचन्द्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची तब्बेत खालवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

खोकला असल्यामुळे बोलण्यास त्रास होत आहे. म्हणून त्यांना कार्यक्रमात भाषण करण्यास अडचण निर्माण होत आहे. या कारणास्तव त्यांचे पुढील ४ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

काल कोल्हापूर आणि सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांना बोलताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »