पुणे : 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील खालील अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून मा.राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात आले आहे.
विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, सुनील तांबे, पोलीस उपअधीक्षक, कारागृह मुख्यालय, पुणे, अहमद शमसुद्दीन मनेर, हवालदार, सांगली जिल्हा कारागृह, गणेश महादेव गायकवाड, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह, प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे, तुळशीराम काशीराम गोरवे, हवालदार, सांगली जिल्हा कारागृह उक्त नमुद कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्याप्रती दाखविलेली सचोटी व निष्ठा याबद्दल गुणवत्तापुर्ण सेवेकरीता सदर सेवापदक जाहिर करण्यात आले आहे. सदरील सेवापदक हे नमुद अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन सेवेतील निष्ठेचा सन्मान आहे.
कारागृह विभागाचे प्रमुख प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मु), कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणेयांनी मा.राष्ट्रपतींचे सेवापदक प्राप्त नमुद अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply