Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची.. दोघांचा मृत्यू,

पुणे : पुण्याजवळील नऱ्हे येथे असणारे वडगाव ब्रिजवर आज पहाटे पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणारे लेनवर एकाच स्विफ्ट कारला एका आयशर बसने धडक दिली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये वाहनाचा चक्काचूर झाला आहे. वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.

या अपघातात दोघांचा मृत्यू ( नाव माहिती नाही ) तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोहम आलिष खळे वय 19 वर्षे, राहणार रो हाऊस नंबर 10 कॅसल वर्ल्ड औंध पुणे, आयुष अंबिदास काटे वय 20 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 305 सिद्धी टॉवर दापोडी पुणे, अथर्व हंबीरराव झेडगे वय 19 वर्ष राहणार पिंपळे गुरव पुणे, प्रतीक दीपक बंडगर व 19 वर्ष राहणार गांगर्डे नगर पिंपळे गुरव पुणे, हर्ष नितीन वरे वय 19 वर्ष राहणार पिंपळे गुरव पुणे अशी जखमीची नावे असून यातील जखमी 2,3,4 हे सिल्वर बर्च हॉस्पिटल नरे पुणे येथे व जखमी 5,6 हे जुपिटर हॉस्पिटल बाणेर येथे पुढील उपचार घेत आहेत. या प्रकरणी बस चालक यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम सूरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »