Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

मारुती आबा तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त कराटेच्या खेळाडुंचा सत्कार

पुणे : लोकप्रतिनिधी तथा माजी नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त कराटे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मारुती आबा तुपे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून काळेपडळ हडपसर येथील श्री संत नामदेव हॉल येथे ‘कराटे डू कोबुडो अकॅडमी’च्या वतीने कराटे खेळाडुंचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी भानुदास शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून वडकी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड, मुंबई पोलीस पोपटराव डोकडे होते. यावेळी मारुती आबा तुपे यांच्या हस्ते केक कापून खेळाडूंना ट्रॉफी मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कराटे खेळाडूंनी चित्तथरारक असे कराटे प्रदर्शन केले.

मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये यशस्वी खेळाडू ग्रँड फिनाले बेस्ट ट्रॉफी विनर गुंजन पारवे गोल्ड मेडल, ग्रँड फिनाले सहभाग – अर्जुन जायभाय गोल्ड मेडल, मृण्मयी किरवे गोल्ड मेडल, स्पृहान कुसुरकर गोल्ड मेडल,
वैष्णवी मिठापल्ली काता गोल्ड मेडल, नेहा विश्वास काता कुमिते सिल्वर मेडल, सार्थक जगताप काता कुमिते सिल्वर मेडल, हर्षवर्धन मोरे काता कुमिते सिल्वर मेडल, मृणाली पाटील काता सिल्वर कुमिते ब्राँझ मेडल,श्रीधर गोडसे कुमिते सिल्वर काता ब्रांझ मेडल, उर्वी साबळे कुमिते सिल्वर काता ब्रांझ मेडल, गौरव विश्वास काता सिल्वर मेडल, देवांश गायकवाड ब्राँझ कुमिते मेडल, मृणाली बाजारे ब्राँझ मेडल, गौरव चोरमले काता कुमिते ब्राँझ मेडल, रेणुका चौधरी कुमिते ब्राँझ मेडल, तेजस मिठापल्ली सहभाग घेऊन सर्व खेळाडूंनी यश संपादन केले.

तसेच कराटे बेल्ट प्रमोशन परीक्षेत यशस्वी खेळाडू व्हाईट ते येल्लो बेल्ट -आरुष परीट, देवांश गायकवाड, मृनाली बाजारे, वेदिका बर्वे, येल्लो ते ग्रीन बेल्ट – आद्या पाटील, अनुश्री जावळेकर, ग्रीन ते ग्रीन 1st – श्रीधर गोडसे, अर्णव देवकर, उर्वी साबळे, सई पोतदार, शिवानी देवकर, स्पृहान कुसुरकर, ब्लू ते ब्लू 1st- अर्जुन जायभाय, ब्लू 1st ते ब्राऊन – अनय भूमकर, वैष्णवी मिठापल्ली,क्षितिज जाधव या खेळाडूंनी सहभाग नोंदवला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक माधवी तौर, अनुराग पारवे, प्रथमेश कांबळे यांनी परिश्रम घेतले सरतेशेवटी उपस्थित मान्यवर खेळाडू पालक यांचे सिहान लहू पारवे यांनी आभार व्यक्त केले. यशस्वी खेळाडूंचं संपूर्ण परिसरात अभिनंदन कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »