Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार

पुणे : प्रजासत्तक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी देशांतील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवारांना हा सन्मान मिळाला आहे.

या पुरस्कारंमध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे. यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली,नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार,व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार, जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार, जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार.

2025 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण

* मनोहर जोशी (मरणोत्तर)
* पंकज उधास (मरणोत्तर)
* शेखर कपूर

पद्मश्री

* अच्युत पालव – कला
* अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
* अशोक सराफ – कला
* अश्विनी भिडे देशपांडे – कला
* चैतराम पवार – सामाजिक कार्य
* जसपिंदर नरुला – कला
* मारुती चितमपल्ली – साहित्य
* रानेंद्र भानू मुजुमदार – कला
* सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी
* वासुदेव कामत – कला
* विलास डांगरे – वैद्यकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »