Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

बिडमध्ये सुदर्शन घुले गँगनंतर आणखी एका गँगवर मकोका

बीड : बीड मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता पोलिसांनी आणखी एका टोळीवर मोकोका लावला आहे. देशमुख हत्या प्रकरणावरून पोलिस चांगलेच action मोडवर आले आहेत. सुदर्शन घुले गॅंगवर मकोकानुसार कारवाई केल्यानंतर आता महिनाभराच्या आतच आठवले गॅंगवर देखील अशाच पद्धतीने मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओंकार सवाई या सहा आरोपीचा समावेश आहे. यामधील सनी आठवले आणि आशिष आठवले हे फरार आहेत. आठवले गॅंगवर गंभीर स्वरूपाचे एकूण 19 गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीमध्ये. खून , दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार खंडणी, लुटमार, बनावट नोटा, मारहाण, असे गुन्हे असल्याने आता बीड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मकोकाअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यावर अशीच कठोर कारवाई केली जाणार असे संकेतच या कारवाईतून दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »