पुणे : आपल्या आजूबाजूला अनेक विचित्र प्रकार घडताना आपण पाहतो. एखाद्याचा राग जर आला असेल तर त्या रागाच्या भररात ती व्यक्ती काहीही करू शकते. अशा घटनाना अल्पवयीन मुळे देखील आता अपवाद राहिलेले नाहीत. लहान मुलांची मानसिकता कुठल्या थराला जाऊ शकते अशी एका घटना दौंड मधुन समोर आली आहे. क्षुल्लक गोष्टीवरून एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार करून त्यानंतर तिला मारून टाकण्यासाठी दुसऱ्या मुलाला शंभर रुपयांची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे.
मात्र विद्यार्थिनीच्या समजसपणामुळे हा सांपूर्ण प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुख्याध्यपकसहा दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. मुख्याध्यपकांनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दौंड परिसरात असणाऱ्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या पालकांची खोटी स्वाक्षरी केली. या गोष्टीची माहिती एका विद्यार्थीनीने शिक्षकांना दिली. त्यामुळे खोट्या सहीची माहिती शिक्षकांना दिल्याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. त्यामुळे त्याने त्या विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा यासाठी 100 रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन मुलाला दिली. हा सर्व प्रकार संबंधित विद्यार्थाने त्या विद्यार्थीनीला सांगितला. त्यानंत्तर तीने हा प्रकार घरच्यांना सांगितला, घराच्यानी याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळकडून योग्य ते उत्तर मिळले नाही.
मात्र उलट या शाळेच्या मुख्याध्यापक्ष आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून विद्यार्थिनींनेच मुलांची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे विद्यार्थिनीची बदनामी आणि शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply