मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगासमोर येण्यासाठी एका मराठी दिगदर्शकाने “छावा” चित्रपटाची निर्मिती होते. मात्र तोच चित्रपट काही दृश्यमुळे वादात अडकला होता. मात्र चित्रपटाचे दिग्ददर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर उतेकर यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर उतेकरांनी माध्यमांशी संवाद साधाला. त्यावेळी ही माहिती दिली आहे.
यावेळी उतेकर म्हणाले की, या चित्रपटामध्ये जी दृश्य वापरण्यात आली होती, त्यामागे कोणाचाही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र अशा दुश्यामुळे इतिहासला तडा जाण्याचा प्रयत्न होणार असेल आणि त्यामुळे चित्रपटाला विरोध होणार असेल तर या चित्रपटातील टी दृश्य आम्ही काढून टाकणार आहोत. या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा कर्ली असून त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या चित्रपटातील ती दृश्य काढणार असल्याचे उत्तेकर यांनी सांगितले आहे.
ते लेझीम नृत्याचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात येणार, असं उतेकरांनी सांगितले. राज ठाकरेंच्या भेटीविषयी ते म्हणाले, “आम्हाला त्यांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. कारण त्यांचं वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास चांगल्याप्रकारे ज्ञात आहे. महाराजांबद्दल त्यांचं खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमके काय बदल करायला हवेत, हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांनी या विषयी मोलाचे मार्गदर्शन देखील केले. त्या बद्दल आपण राज साहबांचे आभार देखील उतेकरांनी मानले आहेत.
Leave a Reply