Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

लोणावळ्यात रायडरला स्टंट करण पडल महागात…! थेट गाडीला जाऊन धडकला, थोडक्यात वाचला जीव

पुणे : सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. कधी चालत्या बाईकवर स्टंट, तर धावत्या ट्रेनमध्ये स्टंट तर कधी उंच ठिकाणावरून स्टंट करताना ही तरुण पिढी दिसते. पण कधी फेमस होण्याच्या नादात आपल्या जीवाला देखील त्यांना मुकावे लागते. अशीच एक घटना लोणावळ्यातून समोर आली आहे. तरुणाने जीवघेणा बाईक स्टंट केला पण तो त्याच्याच अंगलट तो फसला. यावेळी अपघात होऊन तरूण जखमी झाला.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यामध्ये जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात नुकताच एका बाईक रायडर्सचा अपघात झाला. या अपघातात बाईकचा चक्काचूर झाला असून बाईक रायडर जखमी झाला. या अपघातामध्ये सुदैवाने बाईक राइडर बचावला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवार आणि रविवारी बाईक रायडिंग करण्यासाठी पसंती देतात. मात्र हे करत असताना अनेक स्टंटबाजी करतात. त्यामुळे हे बाईक राइडर्स अपघाताला निमंत्रण देण्याचं काम करत असतात. त्यातच एका बाईक रायडरचा भयंकर अपघात झाला. स्टंट करतानाचा त्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.

स्टंट करताना बाईक रायडरचा तोल गेला आणि अपघात झाला. या बाईकराईडरला गंभीर दुखापत झाली. तर त्याच्या बाईकचा चक्काचूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »