पुणे : राज्यासह पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा धोका मोठ्या संख्येने वाढू लागला आहे. या जीबीएस आजाराचा पुण्यात पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात राहणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा या आजाराने मृत्यू झाला आहे. संबंधित महिलाही कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती समोर आली असून 15 जानेवारीला या महिलेला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा आता मृत्यू झाला आहे.
पुण्यात सध्या जीबीएस चे 127 पेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपचार सुरू आहेत. पुणे विभागातील जीपीएस मुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजारामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील बाधित गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पुण्यात जीबीएस झालेला उद्रेक पाहून केंद्रीय पथकाने गंभीर दखल घेत आज केंद्राच्या सात सदसयीय पथकाने पुण्यातील नांदेड गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
एकूणच राज्यभरात जीबीएस थैमान घालू लागला असून नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply