पुणे : अपघाताच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहे. त्यातच पी. पिंपरी चिंचवड शहरात एका पीक अप चालकाने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला आहे. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पिंपरी चिंचवड भागातील ताथवडे-पुनावळे रस्त्यावर घडलेली शुक्रवारी घडली आहे. भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली. मात्र ही धडक दिलंतनंतर त्या पिक अपचे चाक निखळले. त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला अन पार्क असलेल्या दुचाकीला ही पिकअपने ठोकले.
या अपघातात एक महिला जखमी झाली असून वाहन चालवताना चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Leave a Reply