Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

चंद्रशेखर बावनकुळे यांच मोठेपण….! कार्यकर्त्यांनी दिलेला सोन्याचा मुकुट केला परत

अमरावती: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सोन्याचा मुकुट देऊन त्यांचे अमरावती येथे स्वागत केले होते. मात्र ,बावनकुळेंनी मोठे मन दाखवत तो भेट दिलेला सोन्याचा मुकुट कार्यकत्याला परत केला आहे. त्यांच्या मोठेपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

चन्द्रशेखर बावनकुळे हे अमरावती दौऱ्यावर होते . यावेळी त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांना सोनेरी मुकूट भेट म्हणून दिला. मात्र, यावर बोलताना या बावनकुळे यांनी सांगितले कि, अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत आहोत असे स्पष्ट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केला. या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रक्कमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी असे बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केला. यामुळे कार्यकर्त्यांना मोठे बाळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »