Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपतीला भाविकांची मांदियाळी

पुणे : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थी, गणेशजन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिराला आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. पहाटेपासूनच गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत .

मंदिरात शनिवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला तर पहाटे ४ ते ६ यावेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे हा कार्यक्रम सादर केला त्यानंतर सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक होणार आहे.

सकाळी ८ ते ११.३० ते दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत गणेशयाग होणार असून दुपारी १२ वाजता गणेशजन्माचा सोहळा होईल. सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री ८.३० वाजता श्रींची महाआरती होईल आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »