Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

कराड हादरले…! 38 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, मुलाचा विरोध, आईने प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचले

सातारा : प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाचा काटा काढण्याची घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी संबंधित तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उघडलीस आला आहे. यात संबंधित तरुणाचा जीव वाचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघाना अटक केली आहे.

प्रशांत महादेव शेंडगे (वय २४, मूळ रा. शिवडे, ता. कराड) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शोभा महादेव शेंडगे (वय ३८, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे), जयेंद्र गोरख जावळे (वय ४०, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे), सिद्धार्थ विलास वाव्हळे (वय २५, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (वय २५, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत शेंडगे याच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे प्रशांत वारंवार आईशी वाद घालून त्या संबंधाना विरोध करत होता. तसेच तो व्यसनाधीन असल्यामुळे आई शोभा हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेतले. त्यानंतर त्यांनी प्रशांतला रिक्षाने उंब्रजमधून वराडे येथील असणाऱ्या शेतात आणले. त्याठिकाणी त्याला दारू पाजली त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशांतला जखमी अवस्थेत सोडून ते तेथून पसार झाले होते. याबाबत पोलिसाना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास करून २४ तासात चारही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले.

पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, अरुण देवकर, सहाय्यक निरीक्षक किरण भोसले, अशोक भापकर, रवींद्र भोरे, अमित बाबर, रोहित पारनेर, सत्यवान पाटील, विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »