पुणे : यंदाच्या महाराष्ट्र केसरी या किताबावर मुळशीच्या पृथ्वीराज मोहोळ याने नाव कोरले आहे. मानाची गदा त्याने मिळवली आहे. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर दोन विरुद्ध एक गुणांनी पृथ्वीराजने हा विजय मिळवला आहे.
अहिल्यानगर येथे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. अतिशय रोमांचक अशा झालेल्या अंतिम समान्यात शेवटच्या सहा सेकंद उरलेले महेंद्रने मैदान सोडले. मात्र त्यानंतर पंचांनी अंतिम निर्णय घेत पृथ्वीराजला विजयी घोषित केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याला थार गाडीही भेट देण्यात आली.
कोण आहे पृथ्वीराज मोहोळ?
पृथ्वीराज मोहोळ हा मुळशी तालुक्यातील मल्ल असून तो तालुका निवड चाचणीपासूनच तो महाराष्ट्र केसरीची तयारी करत होता. त्याने तालुका स्तरापासून ते जिल्हा व राज्यस्तरावरील महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सर्व कुस्त्या त्याने दहा विरु्दध शून्य अशा मोठ्या गुणांच्या फरकाने आतापर्यंफ जिंकलेल्या आहेत. पृथ्वीराज हा त्याचे आजोबा अमृता मोहोळ यांचा नातू आहे. अमृता मोहोळ यांनीही महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे. आजोबानंतर नातवाने महाराष्ट्र केसरीची गदा मिळविल्यामुळे एकाच घरात दोन महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्या आहेत.
Leave a Reply