Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

नवी मुंबईत गाडी पुढे नेल्याचा राग मनात धरून एकाची हत्या

मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त गाडी पुढं नेल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील खारघर परिसरात हा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा विडिओ देखील समोर आला आहे.

शिवकुमार शर्मा असे मृत व्यजीचे नाव असून त्यांना मारहाण करणारा आरोपीर फरार आहे.  खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजता  हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवकुमार शर्मा आणि आरोपी हे दोघंही एकाच रस्त्यावरून जात होते. आरोपी हा स्कुटीवर तर मृत्यू झालेला व्यक्ती दुचाकीवरून पुढे चालला होता. मात्र शिवकुमार शर्मा हे आरोपीच्या पुढे गेले, त्याचाच राग मनात धरून आरोपीने त्यांचा पाठलाग केला. पुढे सिग्नलजवळ गाडी थांबल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झालं. काही वेळात भांडण एवढे विकोपाला गेले कि, संबंधित आरोपीने त्याच्याकडी हेल्मेटने शर्मा यांना मारहाण करण्यास सुरवात केली. वारंवार हेल्मेटने त्यांच्या डोक्यात मारल्यामुळे ते जखमी झाले. त्या जखमी अवस्थेत देखील ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले. तक्रार देत असताना ते बेशुद्ध झाले. त्यानंतर पोलीसांनी शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगीतले. घटनेतील आरोपी फार असून खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »