पुणे : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. विविध विकास कामंचे उदघाटने त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यात पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबत वक्तव्य करताना गाड्या तोडफोड करणाऱ्यांना आणि कोयता गॅंगला मकोका लावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समोरच पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.
पिंपरी चिंचवड येथे पोलीस मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी या सूचना केल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते.
यावेळी अजितदादा पवार म्हणाले की, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का?अजिबात नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाड्या तोडून पुणे पोलीस आयुक्त यांना विचारला प्रश्न का होत आहेत या घटना? बिबेवाडीत झालेल्या गाड्या तोडफोडीच्या घटनांची अजित पवार यांनी घेतली दखल घेत कोयता गॅंग, गाड्या तोडफोड करण्याचा बंदोबस्त करा. त्यांच्यावर मकोका लावा काय करायचे ते करा.. आम्ही काहीही कमी पडू देत नाही. तसेच आरोपी पकडल्यानंतर त्याची अशी धिंड काढा अख्या शहराला कळालं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. या कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्त हवे होते त्यांना पण आपण सुनावले असतं असे देखील अजितदादा पवार म्हणालेत.
Leave a Reply