पुणे : लोणावळा येथील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असे या पोलीस उपनिरीक्षाचे नाव असून ते पुण्यातल्या खडकी पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपावून ते कामावर कार्यारत नव्हते. त्यांचा कुणाशी संपर्क देखील होत नव्हता. आज अखेर त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याचे ठिकाणी त्यांची गाडी देखील आढळली आहे. त्यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या गाडीत पोलिसांनी तपास केला असता एका डायरी देखील आढळलेली आहे. मात्र या बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसाच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जातं आहे.
Leave a Reply