पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. अनके ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. अशीच एक घटना पुण्यातल्या भेकराईनगर परिसरातून वाहतूक पोलिसावर दगड उचलून हल्ला केल्याची घटना घडली आहे. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. फोनवर बोलत असताना पोलिसाने हटकल्याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक हे भेकराईनगर चौकात वाहतूक नियमांचे कर्तव्य करत होते. गुरुवारी सायंकाळी या परिसरातून एक दुचाकीस्वार गाडीवरून फोनवर बोलता चालला होता. त्यावेळी नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे म्हणाले. या गोष्टीला हटकल्याने संबंधित व्यक्तीला याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला.या घटनेत नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करून फरार झालेल्या दुचाकी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
Leave a Reply