अंतरवाली सराटी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे 15 फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटीत बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे. जर वेळ पडली तर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला आहे.
आम्हाला मुंबईत जायचं आहे, शिवाजी पार्क, आझाद मैदान या सारख्या मैदानांची पाहणी करण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहेत. आम्ही 2/3 दिवसात मैदानाच्या पाहणीची तारीख घोषित करू असं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटीत होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणात दररोज 5/10 मुलं बसतील, या साखळी उपोषणाचे लोळ राज्यभरात पसरेल असं देखील जरांगे म्हणालेत.
मराठा आरक्षण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, परभणी हत्या प्रकरण या सर्व प्रकरणाना न्याय मिळण्यासाठी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद ना मिळाल्याने जरांगे पुन्हा बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहे.
Leave a Reply