मुंबई : अखन्ड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी अभिनेता विकी कौशल हा यात छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे. यात मराठ मोळा अभिनेता संतोष जुवेकर हा देखील ” रायबा” ची प्रमुख भूमिका साकारत आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आदर्शवत असा क्षण घडला आहे.
या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान घडलेला प्रसंग चाहत्यांपुढे मांडताना संतोषनं ज्या उत्साहात त्याची मांडणी केली ते पाहता चाहत्यांनाही त्याच्या अनुभवाचं कुतूहल वाटलं. संतोषने जेव्हा ऑस्करविजेत्या रहमानला संतोषनं अगदी पहिल्या रांगेतून व्यासपीठावर पाहिलं आणि याच रहमानसोबत व्यासपीठावर उभं राहण्याची संधीसुद्धा त्याला मिळाली. एका कलाकारासाठी त्याच्या कलेला, पर्यायी त्याला मिळणारी ओळख आणि कौतुकाची थाप नेमकी काय असते हेच संतोषनं इथं अनुभवलं. विकी कौशल आणि संतोष जुवेकर यांच्यातली असलेली बॉण्डिंग किती असल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल, संतोष जुवेकर यांच्यासह रश्मिका मंधाना, आशुतोष राणा या आणि अशा अनेक कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संतोष जुवेकरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि,
‘काल “छावा” सिनेमाचं Music Album launch होतं. कार्यक्रम झाल्यावर सर्व team ला stage वर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं आधी विश्वासच बसत नव्हता मग महेश दादाने पाठीवर जोरात थाप मारत मला उठवलं म्हणाले” अरे जा उठ तूला बोलावलंय” काय घडतंय काही कळत नव्हतं stage वर गेलो रहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं सरळत्यांच्या जवळ गेलो त्यांच लक्ष नव्हतं तेंव्हा आमच्या vicky भाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रेहमान सरांना हाताला धरून वळवून माझी ओळख(तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करून दिली vicky भाऊ i love u for this forever मी रेहमान सरांच्या चारणांना स्पर्श केलाय त्यांनी माझा हात हातात घेऊन मला शुभेच्छा दिल्यात…… आईईईईई ग!!! सगळ्या कष्टाच फळ एकदम देवानं पदरात एकाच फटक्यात घालावं आणि तेही असं भरभरून. माझ्यासाठी “छावा” सिनेमा आणि रेहमान सरांसोबत एका stage वर एका frame मधे येणं हे केवळ आणि केवळ माझ्या आई बाबांचे देवाचे आणि माझ्या राजांचे आशिर्वाद आणि आजवरच तुम्हां मायबाप प्रेक्षकांच प्रेम’.
https://www.instagram.com/reel/DGAj4YRNEMG/?igsh=MmlpNTh6ZGFuODQz
Leave a Reply