पुणे : जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला अन् पर्यटकांचे लोंढे येथील निसर्ग सौंदर्य न्याहळण्यासाठी आपसूकच आकर्षित झाले इतकेच नव्हे तर सिनेअभिनेत्यांना देखील या तालुक्याची भुरळ पडून चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे जुन्नरच्या गावखेड्यातून होऊ लागले. यापूर्वी सोबती,सेम टू सेम,टिंग्या या मराठी चित्रपटांचे शूटिंग जुन्नर तालुक्यातील गावांमध्ये होऊन त्यांनी त्या काळी बऱ्यापैकी गल्ला जमवून दिल्याचा इतिहास आहे.
जुन्नर तालुक्यातील खामुंडी, उदापूर, उंब्रज येथील काही निसर्गरम्य ग्रामीण भाग सिनेअभिनेते यांना चित्रीकरण करण्यासाठी पसंत पडला आहे. सध्या या भागात एका मराठ मोळ्या हातावर पोट असणाऱ्या गावोंगावी फिरून पाल ठोकून कला सादर करणाऱ्या कलेवर आधारीत कलाकारांच्या जीवनाचा खडतर प्रवास करत वास्तवदर्शी हृदयस्पर्शी एस क्यू कंपनी फिल्म प्रस्तुत दिग्दर्शक शफाक खान यांच्या मार्गदर्शनाखाली व लेखक संजय कसबेकर यांच्या संकल्पनेतून कॉमेडीचे बादशाह सिनेअभिनेते कुशल भद्रीके, सुहास पळशीकर,सिने अभिनेत्री स्मिता तांबे, किरण गायकर आणि इतर कलाकारांना व संपूर्ण टीमला सोबत घेऊन लवकरच हा मराठी चित्रपट “सोंग ” येत्या काही महिन्यात प्रदर्शीत होणार असल्याची माहिती दिग्दर्शीका शफाक खान यांनी दिली.
जुन्नर मध्ये प्रामुख्याने अने माळशेज घाट, नाणेघाट, लागाचा घाट, बदगीचा घाट, शिवजन्म स्थळ शिवनेरीकिल्ला, लेण्याद्री,ओझर, खामुंडीचे विलोभनीय व भव्य असे श्री काळभैरवनाथ मंदिर,उंब्रजचे लक्ष्मी मंदिर ,ओतूरच्या श्री क्षेत्र कपर्दीकेश्वराचा निसर्गरम्य परिसर,खिरेश्वर, हरिश्चंद्र गड , पिंपळगाव जोगा धरण क्षेत्राचा महाकाय जलाशय, चील्हेवाडी धरण प्रकल्प, वडज खंडोबा देवस्थान व धरणाचा विस्तीर्ण परिसर, येडगाव धरण, आळे येथील रेडा समाधी मंदिर, खोडद येथील जागतिक दुर्बीण,विघ्नहर साखर कारखाना, आदर्श ग्राम ठीकेकरवाडी, ओतूरचा मुंजाबा डोंगर आणि धूरनळीचा प्रसिध्द धबधबा,आंबेगव्हाणचे कळमजाई माता मंदिर व नियोजित बिबट सफारीचे क्षेत्र आदी प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांचे व सिने अभिनेत्यांचे प्रमुख आकर्षण बनले आहे,
दरम्यान सोंग चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, धनंजय पालवे, खामुंडी गावचे सरपंच सत्यवान डुंबरे, कैलास बोडके, सचिन डुंबरे आदींनी भेट देऊन चित्रीकरणाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a Reply