Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

लोणी औद्योगिक वसाहतीमधील विस्थापित शेतकऱ्याचे आंदोलन, रोजगार मिळण्याची मागणी

लोणी देवकर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात साधारणतः शेकडो हेक्टर कृषी क्षेत्राचे अधिग्रहण करून लोणी देवकर औद्योगिक वसाहत अस्तित्वात आली आहे. यामध्ये लोणी देवकर,बळपुडी आणि न्हावी आदीं गावातील भूधारकांच्या बागायती, पडीक तसेच माळरान जमिनी यामध्ये संपादित करून औद्योगिक वसाहत निर्माण झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी गेल्याने अनेक जण भूमिहीन झाले.

त्यात बळपुडी ( ता.इंदापूर) येथील शेतकरी अरुण होळकर यांची तब्बल २१ एकर शेतजमीन औदयोगिक वसाहतीमधील क्षेत्रात संपादित करण्यात आली. तेव्हापासून संबंधित शेतकऱ्याला शाश्वत रोजगार मिळाला नाही. त्यांच्या कुटुंबियांना संबंधित कंपनी मध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळावा या हेतूने त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केले मात्र त्याची अद्याप दखल घेतली नाही. या मागणीसाठी गुरुवार (दि.२०) पासून संबंधित शेतकरी संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीच्या गेटवर धरणे आंदोलनास बसले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांस शाश्वत रोजगार मिळावा यासाठी त्यांनी संबंधितांना निवेदन दिली आहेत.

मात्र, इंदापूर तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापणेवेळी ज्या भूधारकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या त्यांना अगदी तोकडा मोबदला देण्यात आला.तसेच संबंधित भूधारकाना येथील उद्योगात शाश्वत रोजगार मिळणे अपेक्षित होते. परंतु येथे असणाऱ्या उद्योगांनी भूसंपादीत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांना जाणीवपूर्वक रोजरापासून वंचित ठेवण्यात येत आहे. संबंधित बहुराष्ट्रीय कंपनी स्थानिकांना जुमानत नसून त्यांनी परप्रांतीय कामगाराना कामावर ठेवले असून स्थानिकांना जाणीवपूर्वक रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत मानव संसाधन व्यवस्थापक प्रसाद उत्तेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »