Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुण्यात स्पीकर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग

पुणे : पुण्यातील आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसागनिक या घटनामध्ये वाढ होत आहे. त्यातच मांजरी खुर्द येथे पहाटे ०४•४३ वाजता अंदाजे ६,००० स्केवर फुट बांधकाम असलेल्या स्पीकर बनविण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

घेटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकुण चार अग्निशमन वाहने दाखल झाली. जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटात आग आटोक्यात आणली. सध्या आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू केले. यात कुणीही जखमी झाले आहे.

जेसीबीच्या साह्याने शेडलगत असणारे पत्रे बाजूला करुन जवानांनी आतमध्ये प्रवेश केला. आगीमध्ये संपुर्ण कारखाना जळाला आहे. सद्यस्थितीत आग पुर्णपणे विझवण्यात आली आहे. याठिकाणी कोणी जखमी अथवा कुठली ही जिवितहानी नाही.

आगीमध्ये सीएनसी मशीन्स, पॅनल सॉ कटींग मशीन, स्पीकर, एम्लिफायर्स, प्लॉयवुड, रंगाचे डबे, फायबर साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग असे साहित्य जळाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »