Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुणे जिल्ह्यात अफूच्या शेतीचा पर्दाफाश, इंदापूरातून साडे सत्तावीस लाखांची झाडे जप्त

पुणे : इंदापूर तालुक्यातील न्हावी गावामध्ये शेतीमालात अमली पदार्थ निर्मीतीसाठी विनापरवाना अफुची लागवड करणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची चाळीस गोण्या बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात करण्यात आली.

विनापरवाना आफुची शेती करणारे रतन कुंडलिक मारकड वय ५० वर्षे, बाळु बाबुराव जाधव, वय ५४ वर्षे,कल्याण बाबुराव जाधव वय ६५ वर्षे तिघेही (रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) या तिघांना अटक करण्यात आले आहे.

वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना शुक्रवार (दि.२१) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना मौजे न्हावी (ता. इंदापूर जि. पुणे) गावचे हद्दीत वरील रतन मारकड व बाळू जाधव या आरोपींनी त्यांच्या मालकीचे शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड विक्री करणेच्या उद्देशाने उत्पादन घेतल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशा नुसारवरील आरोपींच्या शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले.

अफुची लागवड केलेली दिसून येवू नये म्हणुन संबंधित आरोपींनी शेतात कांदा व लसूण पिकांची लागवड करून चोहु बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत कऱण्यात आली असून संबधीत आरोपीविरोधात वालचंदनगर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ब, १५, १८, ३२,४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »