Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

तारकर्ली समुद्रात पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

पुणे : पुण्यातून कोकानामध्ये अनेकजण समुद्र किनारी फिरण्यासाठी जातात.त्यातच पुण्यातील हडपसर भागतील पाच पर्यटक हे मालवण मधील तारकर्ली समुद्र किनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यातील तिघेजण खोल समुद्रात गेले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला तर स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेने हडपसर येथे शोककाळा पसरली आहे.

शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज शनिवारी (दि. 22) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्र किनार्‍यावर फिरण्यासाठी आले होते. त्यात ते अंघोळीसाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. यातील तिघेजण अतिउत्साहच्या भरात खोल पाण्यात गेले. स्थानिकांनी सांगून देखील ते खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले. त्यावेळी एकच आरडा ओरड सुरु झाली. त्यावेळी स्थानिक नागरिकांना त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यात एकाला वाचवण्यात यश आले तर दोघे जण पाण्यात बुडाले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते रुग्णालयात नेण्यात आले आहेत. त्यामुळे समुद्र किनारी फिरायला जाताना त्या ठिकाणची माहिती असणे अंत्यत गरजेचे आहे. अथवा याबाबत तिथल्या स्थानिक नागरिकांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुले समुद्र किनारी फिरायाला जाताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »