पुणे : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा “छावा “चित्रपटच्या स्वरूपात पडद्यावर तुफान गाजत आहे. जगाभरात या चित्रपटाला उदंड प्रतिसाद प्रेक्षकाकांडून मिळत आहे. यात पुण्यातील अट्टल गुन्हेगारांना देखील छावा चित्रपट पाहण्याचा मोह आवारेला नाही. मात्र पोलिसांनी या सरांईताना सापळा रचून थिएटरमधूनच त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३) दोघेही रा. शिव कॉलनी, आदर्श नगर, दिघी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.हडपसर येथील चित्रपटगृहाच्या बाहेरच बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसरमधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले. मात्र, चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले. मकोका गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. दोन्ही आरोपींवर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायदा तसेच शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
यूनिट सहा हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना भादा व भोंड हे हडपसर मधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.
Leave a Reply