पुणे : दिल्लीत सध्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला.ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं.त्यावर उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांचा उल्लेख ” गद्दार सेना ” असा करत त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.
पुण्यात देखील ठाकरे सेना आक्रमक झाली असून त्यांचा निषेध म्हणून ठाकरे शिवसनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवांस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले. यावेळी कृत्रिम मर्सिडीज गाडी नीलम ताईंना भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे चापलुस आणि गद्दार’;सुषमा अंधारे
नीलम गोऱ्हे तीस वर्षे ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर नीलम गो-हे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण मातोश्रीवर एवढा कोणताही माणूस वावरत नव्हता. त्या मातोश्रीवर पडीक असायच्या. कुठे-कुठे प्रॉपर्टी घेतली, परदेशात किती पैसे गुंतवले, याचा जाब द्यायच म्हणता पण जाब हा बरोबरीच्या माणसाला द्यायचा असतो. पण चापलुशा, बदमाशी करून आणि मर्जी मिळवून पद मिळवणारी लोकं असतील तर त्यांना जाब विचारून त्यांची उंची वाढवायची नसते. नीलम गोऱ्हे यांना चार वेळा आमदार असली काय किंवा विधानसभेवर असली काय आमच्या नजरेत बदमाश आणि गद्दार असणार आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply