Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

गजानन मारणे टोळीवर मोक्का कारवाई, गुन्हा घडलेल्या परिसरातून आरोपींची धिंड काढली

पुणे : पुणे पोलीस कोथरुडमधील घटनेनंतर एक्सन मोडवर आली आहे. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण करणाऱ्या तीन आरोपीवर पुणे पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला आहे. यासोबतच मारणे टोळीवर देखील मोका लावण्यात आला आहे. तसेच या मारणे टोळीचा प्रमुख असलेल्या गजानन मारणे याच्यावर देखील कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती स्वतः पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी दिली आहे.

पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकेवर काढत असून कोथरूडच्या घटने नंतर पुणे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांची गुन्हा घडलेल्या परिसरातून धिंड काढली आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, एकूण 27 आरोपी आमच्या रडारवर आहे. टोळीला नेस्तनभूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर करून त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओ कडून मागवली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »