पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवाशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीसोबात हा प्रकार घडला आहे. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत एका नराधमणे हे कृत केले असल्याचे प्राथमिक तापसात समोर आले आहे. घटनेनंतर संबंधित आरोपी पळून गेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास स्वारगेट बसस्थानाकात उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांची पथके आरोपीला शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. या घटनेमुळे पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहेत.
संबंधित तरुणी ही पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट बस स्थानकात आल्यावर ती एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी तीला फलटण बस दुसऱ्या बाजूला थांबली असल्याचे एका अनोळखी व्यक्तीने सांगितले. परंतु माझी एसटी याच ठिकाणी थांबते मी तिकडे जाणार नाही. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला शब्दात अडकवले. मात्र त्या ठिकाणी ती तरुणी गेल्यानंतर ही बस तर बंद असल्याचे तीने सांगितले. परंतु तू टॉर्च लावून आत जा, ही एसटी काही वेळात फलटणला निघेल, त्यानंतर ती मुलगी त्या बस मध्ये चढली त्यानंतर हा नराधम देखील त्या बसमध्ये चढला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार तरुणीने पोलिसांना सांगितला आहे. या प्रकारनंतर पोलीसांची पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. स्वारगेट पोलिसांकडून घटनेचा तपास केला जातं आहे.
स्वारगेट बस स्थानकात चोवीस तास नागरिकांची वर्दळ असते. त्या ठिकाणी असा लल्लास्पद प्रकार घडणे ही अंत्यत निंदनीय गोष्ट आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात घडलेली ही घटना संतापजनक आहे.
Leave a Reply