Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

सराईत गुन्हेगार दत्त गाडेची कुंडलीच समोर , झटपट पैसे कमवायच्या नादात झाला गुन्हेगार

पुणे : स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये एका बंद एस्टीमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बालात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यातील बालात्कार केलेल्या आरोपीला राजकीय वरदहस्त असल्याचे तपासात समोर आले आहे. रामदास गाडे हा आरोपी शिरूर तालुक्यातील गुणाट गावाचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती. तो वृद्ध महिलांना लिफट देण्याच्या बहाण्याने चारचकी गाडीत बसवून त्यांना लुबाडत होता. मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडेल देखील होते. गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

  • रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवाशी आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. गावात त्याचे पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले घर आहे तसेच वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेतात काम करतात. तसेच त्याला एक भाऊ असून, पत्नी, लहान मुले आहेत. एवढंच सुखी कुटूंब असुण देखील रामदास हा काही कामधंदा करत नव्हता. नेहमी तो उनाडक्या करत फिरत होता. त्याला झटपट पैसे कमावायचा नाद लागला. त्या नादात त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. लुबाडायला सुरुवात केली. अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
  • याबाबत पोलिसांनी त्याच्याबाबत माहिती देताना सांगितले की, दत्तात्रय गाडे याने 2019 मध्ये कर्ज काढून एक चारचाकी विकत घेतली होती. त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवाशी वाहतूक करत होता. या दरम्यान त्याने आपल्या चोरीची एक पद्धत ठरवलेली होती. ज्या महिलेल्या अंगावर जास्त दागिने असतील अशा ज्येष्ठ महिलांना लिफ्ट तो देत होता. त्यांना आडमार्गला नेऊन त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने चोरून नेत असे. दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी देखील उभा राहिला होता. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. याशिवाय निवडणुकीच्या काळात त्याने एका राजकीय पुढऱ्याचे निवडणुकीचे काम देखील केले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या सोबतचे फोटो व्हायराल झाले आहेत.
  • तसेच त्याने 2020 मध्ये शिरूर गावाच्या जवळ असलेल्या करे घाटात लूट मार केली होती.त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा देखील दाखल होऊन त्याला शिक्षा देखील झाली होती. तसेच शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता.
  1. स्वारगेट येथे घडलेल्या घटनेत दत्तात्रय गाडे हा मुख्य आरोपी असून तो गेल्या काही दिवसांपासून या परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात सलग होत असलेल्या घटनेमुळे पुण्याच बिहार झाला असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »