Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

दत्ता गाडेला पकडून देणारे प्राध्यापक हिरो गणेश गव्हाणे आहेत तरी कोण..?

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला ज्या व्यक्तीने पकडून दिले ते गणेश गव्हाणे. गणेश गव्हाणे हे शिरूर येथील सिटी बोरा कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करतात.

दिवसभर दत्ता गाडे गाचा शोध घेऊन सर्व यंत्रणा थकली होती. मात्र ज्यावेळी मी रात्री 10 ते साडेदाहाच्या सुमारास आरोपीची चाहूल लागली होती. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला अन् पोलीस यंत्रणा तात्काळ आली. गावातील सर्वजण पोलिसांना मदत करत होतो. प्रत्येकाला पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. त्यामुळे प्रत्येक घरात भीतीदायक वातावरण होतं.

गुणाट गावातील जीपीएल क्रिकेट सामने भरवले जातात, तेथील चंदनवस्ती आहे, तिथं आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वत: पाहिलं पण त्याच्या हातात काही तरी असल्याचे जाणावले आणि मी थोडावेळ थांबलो आणि इतर व्यक्तींना आवाज दिला. त्याच्या हातात रोगारची बाटली असल्याचे लक्षात आपल्यानंतर मी पळत जाऊन त्याला पकडले.

जर त्याला पकडायला उशीर झाला असता तर त्याने आत्महत्या केली असती असे त्याच्याकडे असलेल्या रोगारच्या बाटलीवरून लक्षात आले असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. त्याच्याकडे बाटली असल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले. अन् तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कळवलं, असं गणेश गव्हाणे याने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »