Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीच्या शिक्षेसाठी युवक काँग्रेस कडून लष्कर पोलीस चौकीसमोर आंदोलन

पुणे : स्वारगेट बस स्थानकात बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली. या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.यादरम्यान लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केले. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री,पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तारिक बागवान,विरधवल गाडे.मेघश्याम धर्मावत, आनंद दुबे,आजिनाथ केदार,गणेश उबाळे,पुणे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, हडपसर वि.आ.मतिन शेख, कोथरूड वि.आ.आजीत ढोकळे, सद्दाम शेख, स्वप्निल गायकवाड,विशाल कामेकर, हर्षद हांडे, स्वप्नील शेलार,सौरभ रूपनर, वैभव बुरंगुले, मुरली बुधराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवराज मोरे म्हणाले, “नुकताच गृहमंत्र्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदन पत्र देण्यात आले. हे पत्र कशाच्या आधारावर गृहमंत्र्यना देण्यात आले. आज पुणे गुन्हेगारीच्या दिशीने वळत आहे त्याला जबाबदार कोण. आज हे सरकार महिल्यांच्या सुरक्षा बाबत अपयश ठरलेले आहे. जर या आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली तर युवक काँग्रेस कडून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल”.

सौरभ आमराळे म्हणाले, आज पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देण्यात व्यस्त आहे. एवढेच काय तर गृहमंत्र्यांनी चक्क पीडितेवर आरोप केले आहे. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि दुसरी कडे आज त्याच बहिणीवर अत्याचार होतं आहे तर सरकार मूक गिळून बसले आहे. स्वारगेटची घटना फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »