पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथील बलात्कार प्रकरण ताजे असताना शिरूर तालुक्यात दरोड्यासह सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभ्या असलेल्या १९ वर्षीय तरुणीवर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमोल नारायण पोटे ( वय. २५ वर्षे रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार यांचे बिल्डींग मध्ये कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोदा जि. अहील्यानगर ) व किशोर रामभाऊ काळे ( वय २९ वर्षे रा संस्कृती . डेव्हलपर्स लेन नं. १ कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , कारेगाव येथे १ मार्च रोजी बाभूळसर रस्त्यालगत रात्रीच्या सुमारास १९ वर्षीय पीडित युवती आणि मामेभाऊ गप्पा मारत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकुचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देवुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जबरदस्तीने युवतीला मामेभावासोबत शरीर संबध करण्यास भाग पाडले. यानंतर हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ चित्रित करून या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन नराधमांनी पीडित युवतीवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना घडल्यानंतर आरोपींनी पीडित युवतीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडित युवती आणि मामेभाऊ घरी आल्यानंतर बहिणीस घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित युवतीच्या बहीणीचे पती यांनी ११२ वर कॉल करून सदर प्रकाराची माहीती पोलीसांना दिली असता, पोलीसांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन अमोल नारायण पोटे ( वय. २५ वर्षे रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार यांचे बिल्डींग मध्ये कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोदा जि. अहील्यानगर ) व किशोर रामभाऊ काळे ( वय २९ वर्षे रा संस्कृती . डेव्हलपर्स लेन नं. १ कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड ) या दोघांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेचा प्राथमिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे करत आहेत.
Leave a Reply