पुणे : दौंड तालुक्यात काही दिवसांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली होती. मात्र त्यात आता धक्कादायक ट्वि्स्ट आला आहे. त्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात नाही तर उपसरपंच असणाऱ्या तिच्या पुतण्यानेच डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले आहे.
लता बबन धावडे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या पुतण्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दौंड तालुक्यातील कडेठाण येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी यवत पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. सतिलाल वाल्मीक मोरे ( वय – ३०, मुळ रा तिकी, ता चाळीसगाव, जि धुळे. सध्या रा कडेठाण ता दौड जि पुणे, अनिल पोपट धावडे (वय ४० रा.कडेठाण ता दौड जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत ७ डिसेंबर २०२४ रोजी शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे हिच्यावर बिबट्याने हल्ला करून तिला उसाच्या शेतात फरफडत नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. लता धावडे हिचा बिबट्याच्या हल्ल्यातच मृत्यू झाल्याचा बनाव आरोपी आणि तिथल्या ग्रामस्थांनी केला होता. या शिवाय पोलिस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापुर्वीच तिचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आळे होते. मात्र या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकरणाकडे गांभीर्याने घेतले नाही. या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आले होती. वन विभागांनी ही हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती. मृत महिलेचा मृतदेहाचे शवविच्छेदन वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. मयतास कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून मृत्यु झाला नसले बाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपींनी अनैतिक संबंधाचे कारणावरून आपसात संगनमत करून लता धावडे हिस जिवे ठार मारण्याचा कट रचुन तिचे तोंड व डोके दगडाने ठेचुन तिला जिवे ठार मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी फिर्यादी दिली असून या गुन्हयाचा पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एच. संपांगे हे करीत आहेत
Leave a Reply