Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा आणखी एक पराक्रम समोर, पोलीस वेशातील फोटो समोर

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे दररोज नवीन नवीन पराक्रम समोर येत आहेत. त्याचा आणखी एक पराक्रम आता समोर आला आहे. चक्क पोलिसांचा वेश परिधान करून त्याने अनेकांना गंडवले असल्याचे समोर आले आहे. त्याचा पोलीस देशातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवासी आहे. यापूर्वी त्याने अनेक महिलांची जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील केला आहे. या शिवाय त्यांनी या अगोदर भाजी विक्रेत्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. दत्ता गाडे पोलिसांच्या वेशातील फोटो व्हायरल झाला असून तो या वेशात अनेक बस स्थानकत वावरत होता. पोलीस असल्याचे भासवून अनेकांना तोंडा देखील घालत असल्याचे समोर येत आहे.

दत्ता गाडे याच्याकडे हा गणवेश कसा आला.? याची माहीती अद्याप ससमोर आली नसली तरी त्याचा गणवेशतील फोटो चांगलचा व्हायरल झाला आहे. कधी पोलीस बनून, कधी कंडक्टर बनून तो बस स्थानाकात वावरत आपलें सावज शोधत असायचा. आरोपी गाडे याने पोलिस गणवेशात कुणाला गंडा घातला आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दत्ता गाडेचे लग्न जगाके असून त्याच्या घरी वडील, आई, भाऊ, पत्नी, मुलं असा परिवार आहे. मात्र तो घरात कधीच थांबत नव्हता. सतत बाहेर फिरून उचपाती करत असायचा. चोरी करून पैसे कामावायचा. अनेक महिलांना त्याने गंडा घातल्याचे देखील समोर आले आहे. दत्ता गाडेला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक पराक्रम समोर येत आहेत. मात्र पोलीस वेशातील समोर आलेला फोटो हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »