Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

कारमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची कुंडलीच बाहेर , बाप लेकाचे प्रताप समोर

पुणे : येरवडा परिसरात असणाऱ्या शास्त्री नगर भागात आज सकाळच्या सुमारास एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भर चौकात लघुशन्का केली. त्यानंतर त्याला एका जाणकार पुणेकराने अडवण्याचा प्रयत्न केला पण तो माजुरडा मद्यधुंद अवस्थेत गाडी जोरात चालवत निघून गेला. गौरव आहुजा असे त्याचे नाव असून तो त्याच्या मित्रांसोबत गाडीत मद्यधुंद अवस्थेत आढळला. पोलिसांनी याप्रकरणी त्याचे वडील मनोज आहुजा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात बाप मनोज आहुजा याची देखील कुंडली समोर आली आहे. त्या मुलावर आणि त्याच्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणारा हा गौरव आहुजा नेमका आहे तरी कोण ? त्याची पार्शवभूमी काय ?

फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रीकेट बेटींग च्या गुन्ह्यातअटक केली होती. क्रिकेट बेटिंगमध्ये एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते.या टोळीने काँलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंग मध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून viral झालेल्या व्हीडीओ मुळे गौरव आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »