Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना विषबाधा, आत्महत्येचा प्रयत्न केल्याची निव्वळ अफवा

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना अन्नातून विषाबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

उषा काकडे या माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी आहे. सुरुवातीला त्यांनी झोपेच्या अधिक गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. कौटुंबिक करणातून त्यांनी हे पाऊल उचल्ल्याचे देखील बोलले जातं होते. मात्र रुग्णलयाच्या अधिकृत प्रवक्ता्यांनी उषा काकडे यांना विषबाधा झाली असल्याचे त्यांनी अधिकृतरित्या सांगितले.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे. तसेच ते भाजपचे सहयोगी खासदार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांची ‘संजय काकडे ग्रुप’ या नावाने त्यांची बांधकाम क्षेत्रातील कंपनी पुण्यात प्रसिद्ध आहे.

मात्र, उषा काकडे यांच्याबद्दल पसरलेल्या अफवाने चर्चना एकच उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »