निखिल कणसे
इंदापूर : न्हावी ( ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली. निर्मला तुषार भोसले यांचा ऐकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची न्हावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच गणेश नागनाथ रासकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने जागा रिक्त होती. निर्मला तुषार भोसले यांनी मागिल काही वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन अनेक विकासकामे केल्याने ही निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एम ए पवार ,अध्यक्ष म्हणून सरपंच आशा दिपक डोंबाळे यांनी कामकाज केले.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष अंगद गायकवाड, पोलीस पाटील प्रकाश रासकर, आर पी आय नेते राजू घाडगे ,विशाल घाडगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply