Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांना 12 तासात अटक, लोणीकंद पोलिसांची दमदार कामगिरी

पुणे : पत्नीच्या अनैतिक संबधाचे फोटो मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली. लोणीकंद पोलिसांनी १२ तासात मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली.

ओंकार अंकुश लांडगे (वय-25 वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली), गणेश संजय चौधरी (वय-29 वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित महादेव जाधव यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याने त्याचे पत्नीचे अनैतिक संबंधाचे फोटो अजित याला मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी गणेश याने दोघांना बोलविले. यानंतर अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दोघांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर ते फरार झाले.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्रे फिरवून १२ तासाच्या आत दोघांना अटक केली. लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. लोणीकंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »