पुणे : आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी टेम्पो ट्रॅव्हल्स भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र, त्या टेम्पोला लागलेली आग ही त्या चालकानेच लावल्याचे निष्पन्न झाले. व्योमा ग्राफिक्स कंपनीकडून दिवाळीत मिळालेलं कमी मानधन तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्यासाठी हा सर्व घातपात घडवून आणल्याचे समोर आले आहे. आग लावण्यासाठी बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
चालक जनार्दन हंबर्डीकर असे त्या चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला आहे.
चालक काम करत असलेल्या व्योमा ग्राफिक्स कंपनीकडून त्याला दिवाळीत मिळालेलं कमी मानधन आणि तो कमा करत असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याला अपमानास्पद वागणुक याचा बदला घेण्यासाठी वाहन चालकाने 12 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
चालक जनार्दन हंबर्डीकर याने बेंझिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करत बस पेटवली. जेव्हा आगीचा भडका उडाला तेव्हा त्याने आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उडी मारली. त्यानंतर पुढे बसलेल्या काही कर्मचाऱ्यांनी उडी मारली. मात्र मागे बसलेल्या चार कर्मचाऱ्यांनी मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो उघडला नाही आणि त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात उघड जगले आहे. प्लानिग करूनच चालकाने घातपात घडवून आणला असं पोलिस तपासात समोर आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply