पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड(वय- 50 ), गौरी कैलास गायकवाड (वय- 18 ) गणेश महादेव निर्लेकर (वय- 25 ) अशी मृत झालेल्यांची नावे असून दुर्गा कैलास गायकवाड (वय- 45 ) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत मिळाललेली माहिती अशी की, कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून न्हावऱ्याकडे येत होते. त्यांच्या स्विफ्ट गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर जागीच ठार झाले तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड गंभीर जखमी झाल्या आहेत.
एकाच कुटुंबातील तिघांच्या भीषण अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील शिरूर पोलीस करत आहेत. मृतांना शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Leave a Reply