Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

संतोष देशमुख यांच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधवानी मसाजोगमध्ये ईद साजरी न करण्याचा निर्णय

बीड : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या मसाजोग गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा आदर्शवत निर्णय गावकऱ्यांनी घेतला. मुस्लिम बांधवानी प्रत्यक्ष संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी संतोष देशमुख यांना अश्रू अनावर झाले. यावरून गावातील मुस्लिम बांधवांचे संतोष देशमुख यांच्यावरील प्रेम लक्षात येते..

यावेळी एक पोस्ट वायरल होत आहे.संतोष अण्णा दरवेळेस तुम्ही मोठ्या उत्साहात आमच्या सोबत ईद साजरी करत होतात. तुम्ही या वर्षी हॉलमध्ये मोठी ईद साजरी करायची इच्छा देखील व्यक्त केली होती. दुर्दैवाने आज तुम्ही आमच्यात नाहीत याचा आम्हाला फार दुःख आहे. म्हणून तुमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी साजरीकरणाचा निर्णय घेतला आहे.. समस्त मुस्लिम बांधव मसाजोग असा आवाहन मुस्लिम बांधवांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »