Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा जामीना साठी अर्ज

पुणे : पुण्यातील बहुचर्चित स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आला असून, विशेष म्हणजे चार्जशीट दाखल होण्यापूर्वीच हा जामीन अर्ज दाखल झाला आहे. या प्रकरणात आता दोन ते तीन दिवसांत जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आरोपीच्या वतीने ॲड. वाजीत खान यांनी हा अर्ज दाखल केला आहे. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील पीडित तरुणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले असून, तपास प्रक्रियेत जलदगतीने कारवाईची मागणीही जोर धरत आहे.

न्यायालयात जामीन अर्जावर होणारी सुनावणी या प्रकरणाला नवं वळण देऊ शकते. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना केली होती. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »