Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुण्यात अवकाळी पावसामुळे झाडपडीच्या घटना; अग्निशमन दलाकडे तक्रारी

पुणे : महाराष्ट्रासह पुण्यातपावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाकडे दुपारी ४ वाजून ५३ मिनिटांपासून रात्री ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत एकूण ११ तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय, बालेवाडी येथे लोखंडी शेड पडून एक व्यक्ती जखमी झाली. खालीलप्रमाणे घटनांची यादी:

1. 16:53 – औंध, मेडिपॉईंट हॉस्पिटल रस्त्यावर झाडपडी
2. 17:13 – बावधन, शिंदे नगर येथे इलेक्ट्रिक डिपीवर झाडपडी
3. 17:26 – हडपसर, रामटेकडी बसस्टॉपजवळ रस्त्यावर झाडपडी
4. 17:38 – हडपसर, मगरपट्टा चौक रस्त्यावर झाडपडी
5. 17:41 – मार्केटयार्ड, संदेश सोसायटी येथे झाडपडी
6. 17:44 – हडपसर, किर्लोस्कर कंपनीमागे झाडपडी
7. 18:19 – हडपसर, हुंदाई शोरूमजवळ रस्त्यावर झाडपडी
8. 18:26 – वारजे अग्निशमन केंद्रासमोरील चर्चजवळ रस्त्यावर झाडपडी
9. 18:28 – बाणेर, आंबेडकर नगर येथे चारचाकी वाहनावर झाडपडी
10. 18:44 – कुमठेकर रोड, आवारे खानावळजवळ चारचाकी वाहनावर झाडपडी
11. 18:55 – हडपसर, रामटेकडी, एसआरपीएफ गृप नंबर १ जवळ चारचाकी वाहनावर झाडपडी

तसेच, बालेवाडी येथे लोखंडी शेड कोसळल्याने एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. पावसामुळे झालेल्या या घटनांमुळे वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »