पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. पीडितेच्या अपहरण आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आरोपी राकेश कबीर नाईक नवरे याला सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
श्रीमती एस. एन. सचदेव यांच्या सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकार पक्षाला आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने हा निकाल देण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुरुवात पीडितेच्या काकाने फिर्याद दाखल केल्यापासून झाली होती. त्यांनी आरोप केला होता की, आरोपीने त्यांच्या कायदेशीर रखवालीतून पीडितेचे अपहरण केले आणि तिला त्याचा मित्र यशसोबत पुण्याबाहेर घेऊन जाऊन बलात्कार केला. पीडिता नंतर मुंबई येथे एका महिलेकडे आढळून आली, जिथून तिला पुण्याला परत पाठवण्यात आले. तपासादरम्यान, जुलै २०२३ मध्ये आरोपी राकेशला त्याच्याकडील मोबाइल फोनच्या आधारे अटक करण्यात आली होती.
हा फोन पीडितेशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, त्याचा जामीन अर्जही नामंजूर झाला होता.या खटल्यात पोलिसांनी मोबाइल फोन, दुचाकी वाहन, हॉटेल रजिस्टर, पीडिता आणि आरोपीचे कपडे, आरोपी व पीडितेचे वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादी काकासह मान्य साक्षीदारांचा पुरावा सादर केला होता.
आरोपीतर्फे ॲडव्होकेट सुशांत तायडे यांनी खटला चालवला, तर प्रज्ञा कांबळे तायडे, शुभांगी देवकुळे, जितू जोशी आणि दिनेश जाधव यांनी कामकाज पाहिले.
मात्र, सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केले.न्यायालयाने मोबाइल फोन सरकार जमा करण्याचे आणि दुचाकी वाहन अपील कालावधी संपल्यानंतर मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे सिंहगड रोड परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
Leave a Reply