Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

600 मीटरचा रस्ता खासदार निधीतून करू शकतो, अजितदादा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

पुणे : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील रस्त्यासाठी केलेल्या उपोषणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

पिंपरी येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांना सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी “नो कॉमेंट्स” म्हणत थेट उत्तर देणं टाळलं. मात्र, लगेचच ते म्हणाले, “हा रस्ता अवघा ६०० मीटरचा आहे. रस्ता व्हावा ही खरंच इच्छा असेल, तर खासदार निधीतून तो सहज करता येऊ शकतो.” या वक्तव्यातून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

**दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी चौकशीचे आदेश**
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात डॉ. धनंजय घैसास यांनी राजीनामा दिला असला, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. यावर अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं, “चौकशी अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. कधीकधी आरोप झाले तरी राजीनामा द्यावा लागतो, पण कारवाई चौकशीनंतरच होईल.” या उत्तरातून त्यांनी घैसास यांची पाठराखण केल्याची चर्चा आहे.

**बीड चोरी प्रकरणी कारवाईचे संकेत**
बीड येथील एका कंपनीत चोरी झाल्याच्या तक्रारीबाबतही अजित पवार यांनी भाष्य केलं. “या प्रकरणाची चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, इतर अनेक प्रश्नांवरही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

https://youtu.be/jXvWABX9PN8?si=bbezFFMp-MQEsFFP

अजित पवार यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपोषणावर त्यांनी व्यक्त केलेली मते आणि दीनानाथ प्रकरणातील त्यांचा पवित्रा यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »