पुणे : “एकनाथजी शिंदे हे केवळ उप मुख्यमंत्री नाहीत, तर महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींचे खरे अर्थाने आधारस्तंभ आहेत. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी राबवलेल्या योजना, धोरणे आणि कार्यशैलीमुळे हजारो महिला सक्षमीकरणाच्या प्रवासात सामील झाल्या आहेत,” असे प्रतिपादन ऍड. डॉ. पी. बी. कुंभार, समन्वयक, शिवसेना ओबीसी विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ओबीसी महिला विभाग, पुणे शहराच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली.यामुळे पुणे शहरात ओबीसी समाजातील महिलांच्या हक्कांसाठी प्रभावी कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उर्मिला जागमोहन बनकर यांची शहर अध्यक्षा म्हणून निवड झाली असून त्या सामाजिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. पद्मजा लडकत – कार्याध्यक्षा, माधुरी जगताप – शहर सचिव, प्रीती नायकवाडी – उपाध्यक्षा या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त केला. ओबीसी महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, हक्क व सक्षमीकरण या क्षेत्रात निर्णायक पावले उचलली जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन उर्मिला जागमोहन बनकर यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी जगताप यांनी केले. या वेळी ऍड. डॉ. पी. बी. कुंभार यांनी ओबीसी महिलांच्या विकासासाठी संघटनेच्या वतीने स्वतंत्र कौशल्यविकास शिबिरे, महिला मदत केंद्र, वधुवर मेळावे आणि विविध उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले.
या कार्यक्रमाला भगवान श्रीमंदिलकर, राजेश जगताप,जागमोहन बनकर,हरिभाऊ सावंत, सुरज रामरूळे, भारती वेल्हेकर, उज्वला सावंत, अर्पिता राऊत, नेहा घोलप, भावना पाटील, शिल्पा घोलप, आदिसिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
Leave a Reply